सुलेखाताईंचं लिहणं व जाणं दोन्ही चटका लावणारे

रविंद्र बेडकिहाळ; समाज सेविका ते कादंबरीकार पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। फलटण । सुलेखाताईंचं लिहणं आणि जाणं दोन्ही मनाला चटका लावणारं होतं. त्यांचे साहित्य अनुभवावर आधारीत होते. एक समाजसेविका ते कादंबरीकार हा त्यांचा प्रवास संघर्षमय होता. लेखकाचं घर पेलणारी ही आई, साखर शाळेतील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांची आई होती. पोटातील भूक पोटातच ठेऊन लेखणीतून नवे साहित्य जन्माला घालणार्‍या सुलेखाताईंचा हा प्रवास म्हणजे आयुष्यभर सोसलेल्या कष्टाची गाथाच होय, असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटणचे अध्यक्ष व जेष्ठ विचारवंत रविंद्र बेडकिहाळ यांनी केले. ते सुलेखा शिंदे यांच्या समाज सेविका ते कादंबरीकार या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, साहित्यिक सुरेश शिंदे शांताराम आवटे, माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा. रमेश आढाव,बाळासाहेब ननावरे, बापूराव शिंदे, गोविंद भुजबळ, राजेंद्र बोराटे, सुरेखा फुले, शशिकला नवले, रोहित वाकडे, राजेंद्र बोंद्रे, जयवंत फुले, दादासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्व.सुलेखा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण, वनविभाग फलटण यांच्यावतीने साहित्यिक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुलेखा शिंदे यांच्या लेखणीतून साकारलेल्या मालकाचं खातं, साळवाणाची खोप, लेखकाचे घर पेलताना तसेच त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबरी यावरती सांपादित केलेल्या सुलेखा शिंदे समाजसेविका ते कादंबरीकार या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.साहित्यिकाच्या मृत्युंनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्याच चार पुस्तकांचे प्रकाशन हा दुर्मिळ योगायोग घडला व त्यांच्या साहित्यिक आठवणींना उजाळा मिळाला.

यावेळी सुलेखा शिंदे साहित्य संवाद पुरस्कार खास वाचकांसाठी देण्यात आला. या पुरस्काराचे मानकरी दिलीप पिसाळ, नसीम कादर पठाण यांना मान्यवरांचे हस्तेे गौरविण्यात आले. नासिमा पठाण यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञतपर आपले मनोगत व्यक्त केले. युवा कीर्तनकार नवनाथ महाराज कोलवडकर यांचे कीर्तन झाले त्यांनी आपल्या कीर्तन सेवेत सुलेखा शिंदे यांच्या साहित्यसेवेचा आढावा घेतला. ताराचंद्र आवळे सूत्रसंचालन यांनी केले. विकास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी साहित्य,सामाजिक, शैक्षणिक, वृत्तपत्र, सहकार, राजकीय, कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!