
दैनिक स्थैर्य । 29 एप्रिल 2025। फलटण । येथील शिंपी समाज महिला मंडळाच्या नुकत्याच पदाधिकार्यांच्या एकमताने निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडीत अध्यक्षपदी सुलभा मोहटकर यांची तर उपाध्यक्षपदी अंजली कुमठेकर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी रेखा हेंद्रे, खजिनदारपदी अश्विनी हेंद्रे, सहखजिनदारपदी रुपाली टाळकुटे यांची निवड करण्यात आली
येथील शिंपी समाजाच्या विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या हॉल मध्ये महिला मंडळाच्या सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.