
दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील आरफळ येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२३ जून रोजी साडेआठ वाजण्याच्या पूर्वी आरफळ येथील विनायक जयसिंग पवार, वय ७० यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खबर संजय पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.