
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । दोन मुली झाल्याने व मुलगा होत नसल्याने शारीरिक मानसिक छळ सहन न झाल्याने टॉयलेय क्लिनर पिऊन रुपाली विनायक सूर्यवंशी (रा. भोळेवाडी, ता. कराड, हल्ली रा. समर्थनगर उंब्रज) या विवाहितेने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती विनायक मोहन सूर्यवंशी, सासू सुरेखा मोहन सूर्यवंशी व सासरा मोहन रामचंद्र सूर्यवंशी या तिघांविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अनिल पाटील करत आहेत.