झिरपवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाजवळ कोळकीतील युवतीची आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण – गिरवी रोडवडरील ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ असणाऱ्या विहरीमध्ये कोळकी येथील युवतीने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आलेली आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार कोळकी येथील युवती बेपत्ता असल्याची तक्रार फलटण शहर पोलीस सटेशनमध्ये नोंद करण्यात आलेली होती. त्यानंतर फलटण शहर पोलिसांच्या एका पथकाने सदरील युवतीच्या मोबाईलचे ट्रेसिंग घेतले व मोबाईल ट्रेसिंग नुसार शोध सुरु केला असता फलटण – गिरवी रोडवरील ग्रामीण रुग्णालयाच्या नजीक असणाऱ्या शेतामध्ये सदरील युवतीची सायकल व अन्य वस्तू आढळून आल्या. त्यानंतर फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राऊळ यांनी अधिक तपास केला असता त्यांनी सदर शेताच्या आजूबाजूने शोध घेत विहिरीजवळ युवतीची सॅक व मोबाईल आढळून आला. त्यानंतर पुढील तपास करीत असता सदरील विहिरीमध्ये युवतीने आत्महत्या केली असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.


Back to top button
Don`t copy text!