स्थैर्य, पांचगणी, दि. 31 : महाबळेश्वरच्या एमटीडीसी विलगीकरण कक्षामध्ये शनिवारी सायंकाळी एकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी रविवारी सकाळी उघडकीस आला.
पंधरा दिवसांपूर्वी संबंधित युवक महाबळेश्वर तालुक्याच्या झांजवड गावात आला होता.हा युवक मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत असून त्याला दारुचे व्यसनही होते. सतत आत्महत्या करण्याची धमकी तो करत होता असेही स्थानिक व विलीगीकरण कक्षातील सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले.ही व्यक्ती करोना बाधित आहे का नाही हे अहवाल आल्यानंतर समजणार आहे.घटनास्थळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील,पोलीस निरीक्षक बी ए कोंडुभैरी,आरोग्य अधिकारी अजय कदम व झांजवडचे ग्रामस्थ उपस्थित आहेत.त्याचे शवविच्छेदन करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.घटनास्थळी आरोग्य विभाग आणि पोलीस बंदोबस्त दाखल आहे.सदर व्यक्तीचे नाव प्रशासनाकडून अजून जाहीर करण्यात आलेले नाही.