
दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । सातारा । करंजेत भाग्यश्री मयुर यादव (वय 27, रा. भैरवनाथ कॉलनी, म्हसवे रोड.करंजे) यांनी राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. अवघ्या 5 महन्यिांपूर्वी त्यांचा विवाह झालेला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना सोमवारी समोर आली असून घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत.