
दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२१ । वाई । कुसगाव (ता. वाई) येथील जवानाने मानसिक तणावातुन आत्महत्या केली. अभिजित कृष्णदेव वरे (वय 32) असे मृत जवानाचे नाव आहे. अभिजित हा सैन्यात रायपूर येथे नोकरीला होता. त्याची बदली आसाम येथे झाली होती. तीन महिन्यांपासून तो कुसगाव येथे सुटीवर आला होता.
सतत मानसिक तणावाखाली असायचा. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. दरम्यान, त्याने रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वाईच्या महिला पोलिस हवालदार क्षमा माने तपास करीत आहेत.