लॉकडाऊनमध्ये पालिका निवडणूकीसाठी इच्छूकांकडून साखर पेरणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 22 : सातारा शहरात सध्या लॉकडाऊनच्या काळात काही नवे चेहरेही वॉर्डावॉर्डात सामाजिक कार्याच्या नावाखाली धडपडताना दिसत आहेत. त्यांची धडपड वास्तविक  2021 मध्ये पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरुन सुरु आहे. प्रत्येक वॉर्डात नव्याने अनेकांनी मेहरबान व्हायचेच असे ठरवून साखर पेरणी सुरु केली आहे. लॉकडाऊन ही संधीच आहे असे समजून कामाला लागले आहेत. मग कोण आर्सेनिक अल्बमच्या गोळया वाटते आहे, तर कोण मास्कचे वाटप करत आहेत. दरम्यान, आपलीच उमेदवारी होईल कशी यासाठी आतापासूनच नेत्याजवळ खपामर्जी राखून ठेवत असतानाचे सध्या चित्र दिसत आहे.

येणारे संकट ही एक संधी असते. या संकटातही संधीचे सोने करायचा जप काही मंडळी घेतात. सध्याही करोना लॉकडाऊन हेही एक संकट आहे. हे संकट मोठे असले तरीही आज उद्या हे जाईल. परंतु याच संकटात उद्याचा दिवस काही मंडळी पाहतात. त्याचाच प्रत्यय सातारा शहरात अनेकांना येत आहे. काही मंडळींकडून वाटप सुरु असून मदत देण्यासाठी पुढकार घेताना दिसत आहेत. मात्र,  सुज्ञ सातारकर नागरिकही तेवढेच हुशार आहेत. ही धडपडय़ा कार्यकर्त्यांची धडपड नेमकी कशासाठी सुरु आहे हे जाणून आहेत. त्यामध्ये नोव्हेंबर 2016मध्ये सातारा पालिकेची निवडणूक झाली होती. त्या निवडणूकीत सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी अशा एकमेकांविरोधात लढल्या होत्या. त्यांच्या विरोधात दीपक पवार यांनी भाजपाची आघाडी निवडणूकीत उतरवली होती.

पालिकेत खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आता आहे. 22 नगरसेवक साविआचे आहेत तर आमदार शिवेंद्रराजे यांच्या नगरविकास आघाडीचे 12 नगरसेवक तर भाजपाचे 6 नगरसेवक आहेत. बघता बघता विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल संपायला काही महिने उरले आहेत. हेच जाणून लॉकडाऊनच्या काळात हौसे असणाऱयांनी चांगलीच तयारी सुरु केली आहे. लॉकडाऊनचा कार्यकाळ हा त्यांच्यासाठी संधीच असून मग एकेकांची शक्कल वेगवेगळय़ा पद्धतीने लढवत असल्याचे दिसत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!