श्रीराम साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर; विनाकपात एकरकमी प्रती टन ३०५१/- रूपये देणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण या भागिदारी कारखान्याने सन २०२३-२४ या चालू गळीत हंगामामध्ये येणार्‍या उसासाठी उच्चांकी दर रू. ३०५१/- प्रती मे. टन एकरकमी विनाकपात देण्याचा निर्णय घेतला आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी गाळप हंगाम २०२३-२४ करीता आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बा. पं. शेंडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.


Back to top button
Don`t copy text!