नीरा खोर्‍यातील साखर कारखाने जोमातडिसेंबर अखेर तब्बल 27 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप; 29 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.३ : नीरा खोर्‍यातील काही प्रमुख साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामात डिसेंबर अखेर 27 लाख 95 हजार 740 मे. टन ऊसाचे गाळप आणि 29 लाख 85 हजार 690 क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाने (श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण) 64 दिवसात 1 लाख 94 हजार 533 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे, सरासरी साखर उतारा 11.29 % राहिला असून 2 लाख 18 हजार 50 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी 60 दिवसात 1 लाख 87 हजार  920 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 11.30 % राहिला असून 2 लाख 7 हजार 650 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 61 दिवसात 4 लाख 69 हजार  679 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 10.20 % राहिला असून 4 लाख 68 हजार 800 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने 66 दिवसात 3 लाख 88 हजार  685 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 10.28 % राहिला असून 3 लाख 97 हजार 800 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 65 दिवसात 4 लाख 60 हजार 28 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 10.11 % राहिला असून 3 लाख 97 हजार 500 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने 58 दिवसात 2 लाख 44 हजार  680 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 10.21 % राहिला असून 2 लाख 47 हजार 490 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. कृष्णा  सहकारी साखर कारखान्याने 51 दिवसात 4 लाख 14 हजार 910 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 11.57 % राहिला असून 4 लाख 86 हजार 350 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सह्याद्री  सहकारी साखर कारखान्याने 52 दिवसात 4 लाख 05 हजार  500 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 11.37 % राहिला असून 4 लाख 78 हजार 275 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने 55 दिवसात 83 हजार 805 मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 10.65 % राहिला असून 83 हजार 775 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
जवाहर सहकारी साखर कारखाना लि., हुपरी, जि. कोल्हापूरने 63 दिवसात 7 लाख 64 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा 11.64 % राहिला आहे. साखर उत्पादन 8 लाख 2 हजार 100 क्विंटल झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!