
दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२४ | फलटण |
दुधेबावी (ता. फलटण) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र केरबा नाळे (भाऊ) यांचे आज आकस्मित दुःखद निधन झाले. दुधेबावी ग्रामपंचायत सदस्या दीपाली नाळे यांचे ते पती होत.
राजेंद्र नाळे यांचे निधनाने दुधेबावी परिसरात दु:ख व्यक्त केले जात असून त्यांना राजे ग्रुप, फलटण, मित्रपरिवार व कुटुंबियांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.