दैनिक स्थैर्य | दि. 09 सप्टेंबर 2023 | फलटण | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ना. अजितदादा पवार यांच्या कोल्हापूर येथे होणाऱ्या जाहीर सभेनिमित्त विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जय्यत तयारी सुरू असून उद्या कोल्हापूर येथे होणाऱ्या सभेला मतदारसंघातुन हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
उद्या दि. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता कोल्हापूर येथील तपोवन मैदान, कळंबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सातारा जिल्ह्याची जबाबदारी ही विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर आहे. त्यामुळे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते हे फलटणवरुन कोल्हापूर कडे रवाना होणार आहेत.