
दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । आसियान-भारत संवाद संबंधांच्या ३० वर्षपूर्तीला साजरे करणाऱ्या आसियान-इंडिया आर्टिस्ट्स कॅम्पच्या दुस-या पर्वाचे आयोजन नुकतेच ताज अरावली रिसॉर्ट, उदयपूर येथे करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालय (एमईए) व सेहेर यांनी आयोजित केलेल्या या नऊ दिवसांच्या शिबिरामध्ये आसियान देश आणि विविध भारतीय राज्यांतील जवळपास २० कलाकारांनी सहभाग घेतला, जेथे त्यांनी वैयक्तिक कलाकृती प्रस्तुत केल्या. भारताव्यतिरिक्त इंडोनेशिया, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई, थायलंड, कंबोडिया, लाओपीडीआर, म्यानमार आणि व्हिएतनाम येथील कलाकारदेखील यात सहभागी झाले होते.
आसियान-इंडिया आर्टिस्ट्स कॅम्पच्या समारोप समारंभासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्य मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमस्थळी कलाकृतींचे प्रदर्शन आणि नृत्यप्रदर्शनाच्या सादरीकरणासह शिबिराचा समारोप झाला.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यतमंत्री कलाकार व उपस्थितांचे मार्गदर्शन करत म्हणाले, ‘’आम्ही यावर्षी आसियान-भारत संवाद संबंधांच्या ३० वर्षपूर्तीला साजरे करत आहोत. आर्टिस्ट्स कॅम्पने १० आसियान देश व भारतातील सर्जनशील व्य्क्तींना एकत्र आणण्याचे ध्येय यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. हे शिबिर भारत-आसियान पीपल-टू-पीपल आणि सांस्कृतिक देवाणघेवाणला प्रबळ करण्याच्या दिशेने पाऊल आहे. आम्ही ही परंपरा पुढे घेऊन जाणारे असे अधिक आर्टिस्ट्सक कॅम्प्स राबवण्यास उत्सुक आहोत.’’
सेहेरचे संस्थाकीय संचालक संजीव भार्गव म्हणाले, ‘’आम्ही आसियान आणि भारतातील कलाकारांमध्ये केवळ संवादात्मक कलाकृती तयार करण्यावर काम केले नाही तर कदाचित त्यांची अंतःकरणे एकमेकांच्या जवळ आणण्यातही कुठेतरी यशस्वी झालो आहोत. काही सर्जनशील कलाकार एकमेकांशी संपर्क साधण्याच्या या प्रक्रियेमुळे मला खात्री आहे की, आम्ही या प्रदेशातील लोकांना एकाच व्यासपीठावर आणू शकतो.”