दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । मुंबई । भारतातील सर्वात मोठे आर्थिक शिक्षण व्यासपीठ ईलर्नमार्केट्स यांनी फीनटेक अॅप स्टॉकएज सोबत, फेस२फेस मेगा ट्रेडिंग कॉन्क्लेव्हची पहिली आवृत्ती २६ ते २९ एप्रिल २०२२ या कालावधीत गोव्यात यशस्वीपणे आयोजित केली. तेथे थेट ट्रेडिंग सत्रे आयोजित केली होती ज्यात तज्ञ आणि सहभागींनी सक्रियपणे शेअर ट्रेडिंग केले आणि चांगला नफा कमावला. त्यांनी सत्रादरम्यान मिळवलेल्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग प्रत्यक्ष बघितला.
या ३ दिवसीय मेगा ट्रेडिंग कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थितांसाठी अनेक शिक्षण सत्रे होती. स्टॉकएजने त्याच्या अॅपवरून व्यवहारासह अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये देखील लॉन्च केली. आता सर्व स्टॉकएज वापरकर्ते त्यांच्या संबंधित ब्रोकर्ससह झेरोधा, कोटक सिक्युरिटीज, ग्रो आणि इतर ब्रोकर्ससह थेट अॅपवरून ऑर्डर देऊ शकतील.
स्टॉकएज आणि ईलर्नमार्केट्सचे सह-संस्थापक श्री विवेक बजाज म्हणाले “भारतात आर्थिक साक्षरता खूपच कमी आहे आणि सुरुवातीपासूनच आमचे ब्रीदवाक्य आहे की आमच्या वापरकर्त्यांना त्यांची आर्थिक गुंतवणूक अधिक वाढविण्यासाठी बाजारपेठेतील ट्रेंडसह कुशल बनवणे. आम्ही उपस्थितांचा सहभाग आणि शिकण्याच्या सत्रातील सहभागी पाहून खरोखरच भारावून गेलो आहोत. स्टॉकएज येथे ट्रेड वैशिष्ट्य लॉन्च करण्यासाठी आम्हाला कॉन्क्लेव्ह हे योग्य व्यासपीठ वाटले. लाइव्ह मार्केट दरम्यान ट्रेडिंगद्वारे सहभागींना पोझिशन साइझिंग, मानसशास्त्र आणि जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यापार व्यवस्थापित करण्याचा अनुभव दिला गेला. या यशासह आम्ही गुंतवणूकदारांना कौशल्य प्रदान करून त्यांना गुंतवणुकीसाठी तयार करण्यास असे ऑफलाइन आणि लाइन इव्हेंट आयोजित करण्यास अधिक कटिबद्ध आहोत”.
ज्येष्ठ ट्रेडर असित बरन पती यांनी वेगवेगळ्या ट्रेडिंग इंडिकेटर्सच्या मदतीने ऑप्शन्स बायिंग स्ट्रॅटेजीजवर सत्र घेतले आणि विशाल मलकन यांनी तांत्रिक पॅटर्नचा वापर करून शॉर्ट टर्म ट्रेडिंगबद्दल टिप्स दिल्या. विवेक बजाज आणि प्रमल पारेख यांनी रिलेटिव्ह स्ट्रेंथ वापरून स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीजवर चर्चा केली.
प्रसिद्ध ऑप्शन्स स्कॅल्पर शिवकुमार जयचंद्रन यांनी २-कँडल थिअरी वापरून ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये पैसे कसे कमवायचे हे सहभागींना दाखवले. सहभागींना बाजार संरचनेबद्दल शिक्षित करण्यासाठी ख्यातनाम व्यक्ति पीयूष चौधरी यांनी मल्टी-अॅसेट ट्रेडिंगवर एक सत्र घेतले आणि कुणाल सराओगी यांनी व्हॉल्यूम अॅबररेशन्ससह ट्रेडिंगबद्दल प्रशिक्षण दिले.