दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । बारामती । शालेय जिवनातच विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणी कोडींग मध्ये अभिरुची निर्माण व्हावी यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने ५ जुन २०२३ ते १६ जुन २०२३ दरम्यान आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणी कोडींग या विषयावर ऑनलाईन बूटकॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. हा बूटकॅम्प घेण्यासाठी दिल्ली येथील शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या वायबी फौंडेशन या संस्थेची मोलाची साथ मिळाली.
या बूटकॅम्पमध्ये विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता ७वी ते १०वी मधील १७५ हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, न्यूरल नेटवर्क, पायथन प्रोग्रामिंग इत्यादी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी गूगल टिचेबल मशीन हे टूल वापरून मिनी प्रोजेक्ट तयार केले.
वायबी फौंडेशन संस्थेतर्फे बूटकॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ई – सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड कोडींग बूटकॅम्पचे आयोजन करण्यासाठी संस्थेच्या सर्व शाळांचे प्राचार्य आणी शिक्षक समन्वयक यांची साथ मिळाली अशी माहिती संस्थेचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. विशाल कोरे यांनी दिली.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी अॅड. नीलिमाताई गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शाह, किरण गुजर, मंदार सिकची आणी मॅनेजमेंट कॉऊन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी बूटकॅम्प मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.