जोशी हॉस्पिटलमध्ये 19 वर्षाच्या मुलीच्या खुब्याचे यशस्वीरित्या कृत्रिम सांधेरोपण


दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। फलटण । येथील जोशी हॉस्पिटल येथे नुकतेच 15 वर्षाच्या रुग्णांवर यशस्वीरित्या सांधेरोपण केल्यानंतर पुन्हा 19 वर्षाच्या मुलीवर खुब्याचे यशस्वीरित्या कृत्रिम सांधेरोपण केल्याची माहिती जोशी हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.

डॉ. प्रसाद जोशी म्हणाले, वयाच्या 5 वर्षापासून तिला Perthes disease हा आजार जडला होता. या आजारामुळे खुब्याच्या बॉलचा रक्त पुरवठा कमी पडून तो हळूहळू खराब होऊ लागतो. यापूर्वी तिची 2 ऑपरेशन्स दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये आधी झाली होती. परंतु दुर्दैवानीने खुब्याचा सांधा हळूहळू पूर्णपणे खराब होऊन गोळा पूर्ण विरघळा होता. वाटी पूर्णपणे बुजून गेली होती. हे ऑपरेशन अत्यंत अवघड व गुंतागुंतीचे होते. वाटीचे हाड शोधून त्यामध्ये नवीन वाटी बसवणे गरजेचे होते. या रुग्णाची कोवळी हाडे खोवताना खूप काळजीपूर्वक ऑपरेशन केले गेले. सिरॅमिक ऑन पॉली हा Uncemented सांधा या रुग्णामध्ये बसवण्यात आला. पायाची उंची 3 सेंटीमीटरने कमी होती. ती सुद्धा पूर्ववत दुसर्‍या पायाइतकी करण्यात टीमला यश मिळाले. अशी अवघड शस्त्रक्रिया शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येते. अशा प्रकारची शस्त्रक्रिया जोशी हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदाच यशस्वीरित्या करण्यात आली. हा रुग्ण आता पुढील आयुष्य यशस्वीरित्या जगेल. सर्व हालचाली व कामे उत्तमरित्या करू शकेल, असे विश्वासपूर्ण डॉ. प्रसाद जोशी यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!