विद्यार्थ्यांच्या एकजुटीच्या लढ्याला यश; आदरणीय पवार साहेबांची भूमीका निर्णायक ‘एमपीएससी’च्या निर्णयाचे स्वागत – विरोधी पक्षनेते अजित पवार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परिक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन 2025 पासून लागू करण्याचे जाहिर करुन विद्यार्थ्यांसमोरचा संभ्रम दूर केला आहे. ‘एमपीएससी’च्या या निर्णयाचे स्वागत करत असून गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची भूमीका घेतली होती, ती निर्णायक ठरली. नवीन अभ्यासक्रम सन 2025 पासून सुरु करण्याच्या या निर्णयामुळे उमेदवारांना नवीन स्वरुपातल्या अभ्यासक्रमावर आधारीत परिक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक कालावधी उपलब्ध होणार आहे. या नवीन स्वरुपाच्या अभ्यासक्रामुळे राज्य शासनाच्या सेवेत दर्जेदार अधिकारी उपलब्ध होतील. ‘एमपीएससी’च्या या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. आता विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करुन घवघवीत यश मिळवावे. ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या सर्व‍ विद्यार्थ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.

– अजित पवार, विरोधी पक्षनेते विधानसभा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!