
दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । फलटण । फलटण शहरातील मलठण या भागामधुन जाणार्या पालखी मार्गाचे काम तातडीने सुरू करावे या साठी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी धरणे आंदोलन केलेले होते. त्यांच्या धरणे आंदोलनामुळेच फलटण शहरातीस पालखी मार्गाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. सदरील कामाची सुरवात जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
मलठण या भागामधुन जाणार्या पालखी मार्गाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बबनराव निकम, बबनराव रनावरे, बाळासाहेब भोसले, बबनराव बोके, अशोकराव भोसले, शरद सोनवणे, राजेंद्र नागटिळे, दत्तराज व्हटकर, श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. मदलसा कुंभार, सौ. मीना नेवसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सचिन अहिवळे, नितीन जगताप, नितीन वाघ, अमोल लवळे, राजाभाऊ निंबाळकर, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.