स्थैर्य, फलटण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर (विडणी) शाळेच्या १७ विद्यार्थ्यानी मंथन आणि ज्ञानांजन या स्पर्धा परीक्षेत यश संपादित केले आहे. यामध्ये इयत्ता पहिलीतील प्रणिती नवनाथ लोखंडे, इयत्ता दुसरीतील प्रगती मंगेश शेंडे, संस्कृती संतोष नेरकर, अंजली संतोष माने, यशराज बाळासाहेब शिंगाडे, आर्या बापू काळूखे, प्रणाली प्रशांत अभंग, अमृता संतोष फुले, मानव नितीन करे, इयत्ता तिसरीतिल अर्षदा शरद नाळे, इयत्ता चौथीतील चैतन्य कृष्णा काळूखे, वैष्णवी प्रशांत अभंग, शौर्य संतोष शेंडे, श्रुती महेंद्र शेंडे, हिमानी सुनील जगताप, इयत्ता पाचवी मधील निशा सत्यवान लव्हे, समर्थ तुषार अभंग यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रवींद्र परमाळे, उपशिक्षिका सौ. रेश्मा कोरडे आणि सौ. कोमल जठार यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालक यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
विडणी गावचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गृह मंत्रालयाचे कक्ष अधिकारी धीरज अभंग, महात्मा फुले युवक संघटनेचे अध्यक्ष सचिन अभंग, संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे ,सुभाष अभंग, गटशिक्षणाधिकारी गंबरे, विस्तार अधिकारी मटपती आणि केंद्रप्रमुख सुनंदा बागडे यांनी हि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.