
दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराजा सयाजीराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी वैष्णवी मनिषा सुनिल साबळे या विद्यार्थिनीने २९८ पैकी २३८ गुण मिळवून जिल्ह्यात ७१वा क्रमांक प्राप्त केला.
वैष्णवीने एमटीएस परीक्षेत २०० पैकी १५७ गुण मिळवून राज्यात १२ वा क्रमांक, जिल्हास्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत १५ वा क्रमांक तसेच एनएमएमएस, सैनिक स्कूल व नवोदय परीक्षेतही चांगले यश संपादन केलेले आहे. तिला मार्गदर्शन करणार्या सर्वांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.