विद्या प्रतिष्ठानच्या मुलांचे नाट्यछटा स्पर्धेत यश


दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | बारामती |
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ग. भि. देशपांडे विद्यालयात बालरंगभूमी (पुणे) यांच्यातर्फे अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत इयत्ता पहिली व दुसरी या गटात विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळेची इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी स्पंदन जगताप हिने प्रथम, तर दुसरीतील विद्यार्थी युगंधर जाधव याने द्वितीय क्रमांक पटकाविला.

या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल प्रोत्साहनपर स्मृतीचिन्ह देऊन शाळेला गौरविण्यात आले.
मुख्याध्यापिका रेखा शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!