दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑक्टोबर २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व के. के. वाघ शिक्षण संस्था, कृषी व संलग्न महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन इंद्रधनुष्य 2022 या युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे 21 व कृषी महावद्यालयातील 22 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 27 स्पर्धांचे सादरीकरण झाले व विविध कला प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाची तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. वैभवी सत्यवान रणवरे या विद्यार्थिनीने फाईन आर्टस या कला प्रकारामध्ये मेहंदी या स्पर्धेत विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला.
यााबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी निकम ए. एस., श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अभिनंदन केले.
या इंद्रधनुष्य- 2022 संघाचे संघ व्यवस्थापक प्रा. रासकर ए. एस., प्रा. फडतरे डी. जे., प्रा. भोसले पी. व्ही. व प्रा. नायकवडी आर. डी. यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.