पावर पिक्स जलतरण स्पर्धेत ओम सावळेपाटील चे यश 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२२ । बारामती । पुणे येथील पावर पिक्स स्विमिंग थॉन संस्थेच्या वतीने ओपन वॉटर जलतरण स्पर्धा रविवार ०८ मे रोजी   घेण्यात आल्या   बारामती येथील  विद्या प्रतिष्ठान कमाल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय चा ओम अनिल सावळेपाटील याने १९ वर्षा खालील गटात तिसरा क्रमांक मिळवला आहे.

सदर स्पर्धेत ओम याने   ३ किलो मीटर अंतर 49  मिनिटात पार केले सदर स्पर्धा कासार साल धरण येथे संपन्न झाली होती या स्पर्धेसाठी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय जलतरण पट्टू मार्क रिचर्ड यांनी काम पाहिले सदर स्पर्धेसाठी १९ वर्ष वयोगटात  देश विदेशातून १२० स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. बक्षीस समारंभ प्रसंगी  पावर पिक्स चे अध्यक्ष चैतन्य वेल्लोर, पुणे जिल्हा स्विमिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश मुथा,नगरसेवक मयूर दांगट पाटील,आंतरराष्ट्रीय जलतरण पट्टू डॅनियल दोना आदी च्या हस्ते करण्यात आला.
जून मध्ये होणाऱ्या दिल्ली येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी यातील विजेत्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे या मध्ये ओम सावळेपाटील यांचा समावेश आहे. विजेतेपदक मिळवल्याबद्दल व दिल्ली येथे निवड झाल्याबद्दल विद्या प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष ऍड अशोक प्रभुणे, विषवस्त सुनेत्रा पवार,खजिनदार युगेंद्र पवार,सचिव नीलिमा गुजर व अभियांत्रिकी महाविद्यालय चे प्राचार्य आर के  बिचकर व अभियांत्रिकी महाविद्यालय मधील सर्व शिक्षक वृंद आदींनी ओम सावळेपाटील यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!