एन.सी.सी वार्षिक प्रशिक्षणात छत्रपती शिवाजी कॉलेजचे यश


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन सातारा मार्फत आयोजित वार्षिक शिक्षण शिबिरामध्ये छत्रपति शिवाजी कॉलेज च्या एन.सी.सी. विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले.

सार्जंट गायत्री भिलारे हिने 3 सेंटीमीटरचा ग्रुप करून फायरींगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला तर ऋषिकेश ढाने यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.5 किलोमिटर क्रॉस कंट्री स्पर्धेत सार्जंट विनय जाधवने प्रथम क्रमांक मिळवला तर कॅडेट मृणल जाधव हिने द्वितीय क्रमांक मिळवला. 22 महाराष्ट्र एन सी सी.बटालियनचे कमांडींग ऑफिसर कर्नल दीपक ठोंगे साहेब, कर्नल भालशींग साहेब सुबेदार मेजर सतीश तपसे आणि 22 महाराष्ट्र बटालियनचे सर्व पी आय स्टाफ लेफ्टनंट केशव पवार यांचे मार्गदर्शन लाभले. रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव डॉ विठ्ठल शिवणकर साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!