दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२३ । बारामती । बारामती कराटे असोसिएशनच्या अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विविध शाळा व महाविद्यालयातील ७ खेळाडूनी क्रीडा व युवक सेवा संचालनालाय महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने आयोजित शासकीय शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ४ सुवर्ण ३ कांस्यपदके मिळवून बारामतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले असून हे खेळाडू जिल्हा क्रीडा संकुल व श्री मन्मथ स्वामी मंगल भवन या ठिकाणी बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक सेन्सई रविंद्र करळे, सेन्सई अभिमन्यू इंगुले,सेन्सई महेश डेंगळे
यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी सराव करत आहेत.
त्यांची नावे, शाळा महाविद्यालयाचे नाव, वयोगट, वजनगट व पदके खालीलप्रमाणे
१४ वर्ष मुली-
१) श्रुती शंकर करळे -५० किलो वरील म. ए. सो विद्यालय बारामती (१सुवर्ण पदक)
१९वर्ष मुली
१)पूजा खाडे-३६-४० किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.(१ कांस्य पदक)
१४ वर्ष मुले-
१)प्रतीक विनोद खडके-२० किलो खालील(१कांस्य पदक)
आर.एन. अगरवाल टेक्निकल हाईस्कूल, बारामती.
१७ वर्ष मुले
१)ऋषिकेश मोरे-५४ ते ५८ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती(१सुवर्णपदक)
२)हर्ष भोसले-६२ ते ६६ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती (१सुवर्णपदक)
१९वर्ष मुले
१)जय साबळे-४० ते ४५ किलो
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती.(कांस्य पदक)
२)सुमेध कांबळे -४५ ते ५० किलो
विद्या प्रतिष्ठान ज्युनियर कॉलेज एम.आई.डी.सी(१सुवर्णपदक)
त्यांच्या या यशस्वी कामगिरी बद्दल शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार , विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील , जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे , ता. क्री.आ. अनिल सातव , शासकीय कराटे स्पर्धा प्रमुख क्री.आ महेश चावले व बारामती कराटे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.