कटफळ मॅरेथॉन मध्ये अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूलचे यश


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । बारामती । भारतीय स्वातंत्र्याच्या आजादी का अमृत महोत्सव निमित्त ग्रामपंचायत कटफळ आयोजित, कटफळ मॅरेथॉन 2022 मध्ये अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रेया संजय सिंग इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने लहान गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले बक्षिस स्वरूपात रोख रक्कम 501 रुपये मेडल व प्रमाणपत्र तसेच मोठ्या गटामध्ये कुमारी दिव्या हनुमंत नीलटे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने मोठ्या गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले पुरस्काराच्या स्वरूपामध्ये रुपये 2001 रोख रक्कम ,मेडल व प्रमाणपत्र देऊन कटफळ गावच्या सरपंच पुनम कांबळे, उपसरपंच सीमा मदने, ग्रामपंचायत सदस्य संग्राम मोकाशी व ग्रामविकास अधिकारी एच. डी . पोंदकुले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मॅरेथॉन स्पर्धेसाठी अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडाशिक्षक मनोज मदने संस्थेच्या सचिवा सौ संगीता मोकाशी, मुख्याध्यापक श्री प्रशांत वणवे यांनी मार्गदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!