स्थैर्य, सातारा, दि. ०४ : परळी खोऱ्यात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रीघ लागते परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व पर्यटनस्थळावर पर्यटकांची ओढा कमी झाली आहे परंतु शनिवारी दुपारी सातारा येथील जितेंद्र संभाजी माने वय 51 हे आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी उरमोडी जलाशयाच्या नजीक गेले होते परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला त्यांच्यासमवेत असलेल्या मित्रांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घरच्यांशी पोलिसांशी झालेल्या घटनेचा तपशील दिला कुटुंबीय तसेच पोलिसांनी घेऊन तपास सुरू केला.
अधिक माहिती अशी की, सातारा येथील जितेंद्र संभाजी माने वय वर्ष 51 (रा. पंतांचा गोट) येथील रहीवाशी असुन हा युवक परळी धरणावर फिरण्यासाठी शनिवारी दिनांक 2/8/2020 रोजी दुपारी अंदाजे 12 वाजनेच्या सुमारास गेले होते. धरता लगतच हाॅटेल सह्याद्री फार्म हाऊस या हाॅटेल च्या मागिल बाजुलाच धरणाच्या पाण्यात पोहण्याकरता गेले असता त्या पाण्यातच बुडुण म्रुत्यू झाला. या बाबतची खबर सातारा तालुका पोलिस स्टेशनला खबर मिळताच छ. शिवेंद्रराजे रेस्क्यूला माहीती देऊन तात्काळ परळी धरण येथे येण्यास सांगितले. अशी माहीती मिळताच चंद्रसेन पवार (बबलु) अब्दुल सुतार (पिंटु शेठ) देवा गुरव, अदीत्य पवार व सुहेल सुतार हे जनता अम्ब्युलन्स घेऊन घटना स्थळी २ वाजता पोचली. म्रुतदेह सध्याकाळचे 7 वाजे पर्यंत शोधाशोध चालुच होते म्रुतदेह काही सापडला नाही. अंधार पडल्याने शोधण्याचे का स्थगित केले. व दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर ट्रेकर्स, छ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स हे स्पीड बोटच्या साहाय्याने शोधण्या सुरुवात केली अतोनात प्रयत्ना नंतर 11 वाजता म्रुतदेह शोधण्यात यश प्राप्त झाले.
या वेळी तालुका पोलिस स्टेशन चे परळी दुरक्षेत्र बीट अंमलदार डी. बी. बर्गे, पी.एस.आय. देव साहेब, जी.बी.देवकाते, व शिवेंद्रराजे रस्क्युटीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सुनिल भाटीया, चंद्रसेन पवार, अब्दुल सुतार (पिंटु शेठ), अनिल केळगणे, कुमार शिंदे, सुहेल सुतार, अमित कोळी, जयवंत विरामणे, देवा गुरव,आदित्य पवार, संदिप जांभळे, सुनिल वाडकर, व. इतर सर्वानी मोलाचे सहकार्य केले.
सदरचे मयत जनता अंम्ब्युलन्स मधुन सातारा येथे शासकीय रूग्णालयात नेण्यात आला. पुढील तपास पोलिस ह. डी.बी बर्गे करत आहेत.