दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । फलटण । वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांचा 54 वा वाढदिवस विविध कार्यक्रमाने फलटण व तालुक्यातील विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.वाढदिवसाच्या औचित्य साधून कै.भाऊसाहेब दैठणकर आश्रम शाळा निंभोरे येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या सुभाषराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त निंभोरे येथे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्र माजी उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे , जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब केंगार, महिला उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड या जिल्ह्यातील माझी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच सातारा जिल्हा आय टी विभाग प्रमुख विकास निकाळजे, सातारा जिल्हा सदस्य सुखदेव रणदिवे, प्रिया जगताप, अमोल लोंढे, फलटण तालुका संघटक अमित गायकवाड, विकास मोरे, विजय कांबळे, दादा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.