स्थैर्य, सातारा दि. 5 : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नवीन वाहनांच्या नोंदणीचे कामकाज यापूर्वीच सुरु केलेले आहे. लर्निंग लायसन्स, पक्के लायसन्स व योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण व्यतिरीक्त इतर कामकाज दि. 8 जून 2020 पासून काही प्रमाणात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा संजय राऊत यांनी दिली.
परिवहन विभागाच्या बहुतांश सेवा parivahan.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्ज स्विकारण्यात येतील. अशा सेवाबाबतचे हस्तलिखित अर्ज स्विकारले जाणार नाहील. वाहनाचे हस्तांतरण, बँक बोजा नोंद, एन.ओ.सी., डुप्लिकेट आर. सी., वाहनातील फेरबदल इत्यादी तसेच डुप्लिकेट लायसन्स व नुतनीकरण कामकाजाबाबतची कागदपत्रे कार्यालयीन इमारतीच्या तळमजल्यावरील खिडक्यांवर सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत स्विकारली जातील. या कागदपत्रांवर दोन दिवसांनंतर कार्यवाही करण्यात येईल. नाकारण्यात आलेले अर्ज त्याच दिवशी सायं. 5.00 ते 5.30 या वेळेत संबंधितांना परत देण्यात येतील.
तसेच ज्या नागरिकांचे कार्यालयात कामकाज नाही त्यांनी कार्यालयाच्या आवारात येऊ नये. कार्यालयाच्या आवारात येणाऱ्या सर्व नागरिकांन मास्क वापरणे बंधनकार असून सोशल डिस्टंन्सिगचे पालन करणे बंधनकार राहील असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा संजय राऊत यांनी सांगितले आहे.