भारत-अमेरिका द्विपक्षीय बैठकीनंतर स्टडी ग्रुपचा मोठा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी नुकतेच अमेरिका दौ-यावर जाऊन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. तासभर चाललेल्या या बैठकीत भारतामधील संबंध सुधारण्याच्या नव्या आशेसह अनेक निष्कर्ष निघाले. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण यांसंदर्भात सहकार्य वाढवण्यासाठी यूएस-इंडिया गांधी-किंग डेव्हलपमेंट फाऊंडेशन या सर्वात महत्त्वपूर्ण सहयोगाचा शुभारंभ झाला.

दोन्ही देशांनी वास्तविकतेमध्ये नवकल्पना आणण्यासाठी क्रॉस-कल्चरल शिक्षणाप्रतीवर सहमती दर्शवली आहे, ज्यामुळे भारतीय शिक्षण क्षेत्राला दरवाजे खुले होतील आणि दोन्ही देश जागतिक भागीदार म्हणून प्रकाशझोतात येतील. अग्रगण्य जागतिक आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदाता स्टडी ग्रुप भारतीय विद्यार्थ्यांसाठी युनायटेड स्टेट्समध्ये व्यापक सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या वाढीसह जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त जागतिक दर्जाचे शिक्षण मिळविण्यासाठी याकडे एक अद्भुत संधी म्हणून पाहतो.

स्टडी ग्रुपचे प्रादेशिक संचालक करण ललित म्हणाले, “आम्‍ही भारतीय विद्यार्थ्यांना यूएसमध्ये शिक्षण घेण्यास आणि अमेरिकन ड्रीम समजण्यास मदत करण्यासाठी आमच्या कटिबद्धतेमध्ये नेहमीच खंबीर राहिलो आहोत. ऐकून चांगले वाटते की, यूएसने २०२१ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी ६२,००० व्हिसा जारी केले आहेत. युनायटेड स्‍टेट्समधील जवळपास २००,००० भारतीय विद्यार्थी अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये प्रतिवर्ष ७.७ बिलियन अमेरिकन डॉलर्सचे अद्भुत योगदान देत आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये अविश्वसनीयरित्या उत्तम कामगिरी करताना पाहण्यासारखा उत्तम पुरस्कार नाही. शेवटचे म्हणजे, मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत-अमेरिका संबंध अधिक उत्तम करण्याप्रती त्यांची अविरत समर्पितता व लक्ष्यासाठी आणि असंख्य भारतीय विद्यार्थ्यांना उदयोन्मुख शैक्षणिक संधी देण्यासाठी आभार मानतो.”

अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट ५,००० मास्टर प्रशिक्षणार्थींना सायबर सुरक्षितता व डेटा गोपनीयतेमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी भारतामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हा प्रोग्राम २००,००० भारतीय तरूणांना सायबर सुरक्षिततेमधील करिअर्ससाठी प्रशिक्षण देईल.


Back to top button
Don`t copy text!