स्थैर्य, मुंबई, दि.१३: परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळण्याकरिता आघाडीची जागतिक आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदाता स्टडी ग्रुपने महत्त्वाकांक्षी जॉब रेडी प्रोग्राम लाँच केला आहे. याद्वारे अर्जदारांना त्यांच्या युके पार्टनर विद्यापीठांमध्ये शिकत असताना त्यांची कौशल्ये आणि नोकरीच्या क्षमता सिद्ध करता येतील. जे विद्यार्थी युके इंटरनॅशनल स्टडी सेंटर किंवा इंटरनॅशनल कॉलेजमध्ये जागा निश्चित करतील, त्यांच्यासाठी स्टडी ग्रुपतर्फे या सेवेचे मूल्य प्रदान केले जाईल.
जॉब रेडी प्रोग्राम हा विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख परिवर्तनीय कौशल्ये विकसित करण्यासाठी तसेच नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. तसेच शिक्षण घेताना कमावण्याची संधी आणि एकदा विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर जागतिक स्तरावर नोकरीची संधी मिळवणे त्यांना शक्य होईल.
स्टडी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जेम्स पिटमॅन म्हणाले, “या महामारीने आमच्या भारतातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर भयंकर परिणाम केला आहे. त्यामुळे यावर्षी स्टडी ग्रुपमध्ये, आम्ही जॉब रेडी प्रोग्राम लाँच करत आहोत. जेणेकरून त्यांची नोकरीची क्षमता विकसित होईल आणि ते त्यांचा अभ्यास सुरू ठेवतील. मुलाखतीच्या तीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी सीएएस / आयसीएएस विद्यार्थ्यांना समर्पित सहाय्य देण्याबरोबरच, डिग्री प्रोग्राम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या करिअरची तयारी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना मदत करतील.”