स्थैर्य, सातारा, दि. 18 : स्टडी फ्रॉम होम, व्हर्चुअल क्लासरूमचे फॅड आता बंद होणार आहे. सातारा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी याबाबतचे आदेश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. केवळ दहावी-बारावी पाचवी व आठवी स्कॉलरशिप वगळता अन्य कोणत्याही वर्गाचे ऑनलाइन अभ्यास न घेण्याबाबत स्पष्टपणे निर्देश दिले आहेत .आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे स्टडी फ्रॉम होम चे फॅड बंद होणार आहे .याबाबत बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले की, केवळ दहावी-बारावी आणि पाचवी व आठवी स्कॉलरशिप चे तास सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत .मात्र बाकीचे स्टडी फ्रॉम होम किंवा व्हर्च्युअल क्लास बंद करण्याच्या सूचना सर्व शाळा व विद्यालयाचे मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात झाल्यानंतर एकत्रित गर्दी संपर्काच्या ठिकाणी शाळा हे प्रमुख ठिकाण म्हणून सर्व शाळांना सुट्टी देण्यात आल्या. तोपर्यंत निम्माच महिना संपला होता अभ्यासही पूर्ण झाला होता. फक्त दुसऱ्या सत्राची संकलित चाचणी राहून गेली. पण सातत्यपूर्ण मूल्यमापन त्यामुळे तिथेही काहीच घडले नाही .शिक्षकांनी अशाही स्थितीत शाळेत जाऊन निकाल तयार केले. पोषण आहार वाटला. शाळांच्या खोल्या प्रशासनाला दिल्या, srvhet सहभाग घेतला तरीही नेहमीच आपण काय काम करायचे किंवा शिक्षकांना काय काम लावायचे याबाबत सातत्याने संशोधन करणाऱ्या बुद्धिमान लोकांच्या मनातील राक्षस जागा झाला.त्यातून स्टडी फ्रॉम होमचे फॅड अस्तित्वात आले आणि गरजेपेक्षा त्याचे स्तोम अधिकच माजवले गेले.
मे महिना उन्हाळी सुट्टीचा असतानाही विद्यार्थ्यांना स्टडी फ्रॉम होम च्या नावाखाली मोबाईल मध्ये जुंपण्यात आले अनेक गोरगरीब कष्टकरी लोकांनाही अँड्रॉइड मोबाईल घेऊन मुलांच्या हाती देण्यास भाग पाडले गेले. जिल्हा मुख्यालयातून प्रश्नपत्रिका यायला लागल्या. शिक्षक त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू लागले .अडचणी खूप होत्या पण काम करा माहिती काहीच मागितले जाणार नाहीये. अधिकारांच्या आश्वासनांना निश्चित होऊन शिक्षक काम करत राहिले. स्टडी फ्रॉम होम हे प्रत्येक घरात एवढे पसरली आहे की पालकांच्या हातात आता मोबाईलच राहिला नाही. अगदी चिमुरडी पोर ही मोबाईलला कवटाळून बसले आहेत. नुकतीच सर्व शाळा मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली .या बैठकीत स्टडी फ्रॉम होम, व्हर्च्युअल क्लासरूम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्याची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. या ऑनलाइन व्हर्च्युअल क्लास साठी अंध व गरीब विद्यार्थ्यांना काही शाळांकडून मोबाईल सक्ती केली जात आहे. गरीब झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांना संबंधित शाळानी अँड्रॉइड फोन घेण्याची सक्ती केली. एकीकडे करोनाच्या ताळेबंदींत दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असतानाही माणसं मोबाईल व त्याचा नेट पॅक यासाठी पैसे कोठून आणायचे असा सवाल उपस्थित करत आहेत. करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील तसेच सातारा शहराच्या भीमाबाई आंबेडकर विद्यालयातील काही शिक्षकांनी ऑनलाईन वरचे क्लाससाठी मोबाईल सक्तीचा केल्याची तक्रार पालकांनी केली व त्यांनी बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
याबाबत चोरगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप शैक्षणिक शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केली. संबंधित पालकांचे असे म्हणणे आहे, ते काम धंदा नसल्याने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे मुलगी भीमाबाई आंबेडकर शाळेत तर मुलगा श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये शिकत आहे .शाळेने मोबाईल सक्तीचा केला असून त्यावर त्यांनी शिकण्यास शिकवण्यास सुरुवात केली आहे .मात्र पैसे नसल्याने मोबाईल घेऊ शकत नाही. मुलानेही मोबाईल सक्तीचा केला असून आठवीची परीक्षा ही घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी हा बंदीचा आदेश दिला आहे.