दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सध्या फलटण शहरासह ग्रामीण भागामध्ये चायनीज मांजाच्या वापरामुळे अनेकांना गंभीर दुखापत तर काहींना जीवासही मुकावे लागले आहे. या मांजामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच प्राश्वभूमीवर मलठण, फलटण येथील श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पतंग उडवण्यासाठी नायलॉन किंवा तंगुसचा मांजा वापरणार नसल्याची शपथ प्रा. सतीश जंगम यांनी दिली.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य रणदेव खराडे, प्रा. रवींद्र कोकरे, रविंद्र शिंदे, रवींद्र लडकत, सौ.संध्याराणी शिंदे, मारूती भिसे, सौ. मीना नेवसे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.