विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : मिलींद नेवसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । फलटण । महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असणार्‍या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘महाज्योती’ या विविध स्वायत्त संस्थांच्याद्वारे 11 वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या, एस.सी, ओबीसी, व्ही.जे.एन.टी., एस.बी.सी. विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब व ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर जेईई, नीट, एम.एच. – सीईटी स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तकें विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जाणार आहेत. याकरिता विद्यार्थ्यांनी अर्जाद्वारे आपली नोंदणी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत ‘महाज्योती’ या स्वायत्त संस्थेकडे करणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सातारा जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले.

सदर योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. या अनुषंगाने नुकताच मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मिलिंद नेवसे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, उपप्राचार्य एस. डी. ठोंबरे यांच्या सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बदलली आहे. सर्वसामान्यांना विद्यार्थ्यांसाठी महागडे मोबाईल घेणे व कोचिंग क्लास लावणे अशक्य बनले आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना आणण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे व त्यासंदर्भातील अर्ज भरून घेतले जात असल्याचे मिलिंद नेवसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या वतीने मोफत आनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असून विद्यार्थ्यांना मोफत टॅब पुरवले जात आहेत याचा लाभ घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना वर्ग 10 वी मध्ये शहरी विभाग 70% व ग्रामीण भाग 60% गुण असणे आवश्यक आहे. तसेच नॉन क्रिमीलेयर, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी विद्यार्थ्यांनी दिनांक 15 नोव्हेंबर पूर्वी आपले अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले.

यासोबतच सारथी व बार्टी मार्फत देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती या वेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपप्राचार्य ए. डी. ठोंबरे यांनी मानले तर कार्यक्रमास सहकार्य रघुनाथ कुंभार यांचे लाभले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह शिक्षकांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!