शासकीय योजनांपासून विद्यार्थी वंचित राहता कामा नये – डॉ. अभिजित जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थित महसूल सप्ताहाच्या निमित्ताने कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राचार्य बाबासाहेब गंगावणे यावेळी म्हणाले की, आपल्या कार्यालयाकडून आम्हाला सतत काहीना काहीतरी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असणार्‍या योजनांचा तुम्ही वेळोवेळी आम्हाला लाभ देत असता. अशा कार्यक्रमाचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवता, त्याबद्दल त्यांचे व तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

यावेळी डॉ. अभिजीत जाधव यांनी शासनाच्या विविध योजनांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही विविध योजनांचे आयोजन केले आहे, त्या योजनांपासून कोणीही विद्याार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमात डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते माध्यमिक विभागामधील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी विविध परीक्षेत प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी तहसील कार्यालयातील सौ. सावंत मॅडम, लक्ष्मण अहिवळे, प्रशालेचे ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य देशमुख, प्रा. सुधाकर वाकुडकर, प्रा. पवार, क्षीरसागर आण्णा उपस्थित होते.

सूत्रसंचलन प्रा. पवार यांनी केले तर आभार उपप्राचार्य देशमुख यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!