
दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । सातारा । “देशात तसेच परदेशात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करुन आपल्या महाविद्यालयाचे तसेच परिसराचा नावलैकिक वाढवावा” असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंञी शरद पवार यांनी केले.
करंजखोप ता कोरेगाव येथे आयोजित शारदाबाई गोविंदराव पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील,विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील,आ.दिपक चव्हाण,कृषी सभापती मंगेश धुमाळ,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील,संस्थेचे डॉ.विठ्ठल शिवणकर,संजय पाटील,संजय नागपूरे ,प्रतिभा गायकवाड,डॉ.शिवलिंग मेनकुद्ळे,राजेंद्र साळुंखे,सुरेश गोडसे,चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, ग्रामिण भागात शेती क्षेञ उपजिविकेचे साधन असले तरी बदलती वातावरणीय परिस्थिती व अन्य कारणांमुळे शेतीतून शाश्वत उत्पन्न बेभरवशी झाल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांनी शेतीवर अवलंबून न राहता पर्यायी आर्थिक साधनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार व सवंगड्यांच्या मैञीला उजाळा दिला.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच आपले उद्दिष्ठ निश्चित करावे असा सल्ला दिला.
दरम्यान यावेळी रयत शिक्षण समितीचे अधिकारी, डी.के.पवार,सुनील माने,सुनील खत्री,प्रभाकर देशमुख,प्राचार्य प्रदीप लावड,रामभाऊ लेंभे, सुरेश साळुंखे,सतीश धुमाळ,अशोक लेंभे,भुषण पवार,मंगेश जगताप, संदीप धुमाळ,धनंजय धुमाळ, सरपंच नेवसे,स्कूल कमिटी पदाधिकारीउपस्थित होत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज लेंभे,उर्मिला नाचण यांनी केले. महाविद्यालयातील,शिक्षक कर्मचारी व परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.