दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । फलटण । खेळामुळे मन आणि शरीर याचा व्यायाम होत असून क्रीडा स्पर्धांच्या मुळे विद्यार्थ्याला आपली क्षमता व जय पराजय अनुभवण्याची मानसिकता निर्माण होते. विद्यार्थ्यांनी खेळताना नेहमी खेळाडू वृत्तीने खेळावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या व नियोजन मंडळाच्या सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले.
श्रीमती प्रेमालाताई चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या फलटण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी सौ जिजामाला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फलटण नगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले संचालिका सौ मनीषाताई नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सौ मीना नेवसे, सौ मदलसा कुंभार, तालुका क्रीडा अधिकारी दत्ता माने, फलटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ सोनवलकर, उपाध्यक्ष उत्तम घोरपडे यांची प्रमुख उपस्थित होती.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे स्वागत करून सर्वांनी खेळ खेळाडू वृत्तीने घ्यावा खेळताना कोणताही द्वेष निर्माण करू नये असे सांगून खेळाचे महत्व पटवून दिले. पाहुण्यांच्या हस्ते कबड्डी मैदानाची पूजन करून नाणेफेकी नंतर पहिल्या सामन्याची सुरुवात झाली. प्रास्ताविक चौधरवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित गायकवाड यांनी केले. स्वागत प्राचार्य रणदेव खराडे व मुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी मुख्याध्यापक शिवाजी पवार यांनी केले. यावेळी राष्ट्रीय खो खो खेळाडू संचिता गायकवाड व संघ व्यवस्थापक सौ. शुभांगी गायकवाड तसेच कबड्डीचे राष्ट्रीय पंच कदम यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन रवींद्र कोकरे यांनी केले तर आभार दशरथ लोखंडे यांनी मानले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, राहुल शहा, शरद सोनवणे तानाजी करळे महेश लवळे, राजाभाऊ निंबाळकर, नितीन वाघ, आत्माराम सस्ते, सचिन कांबळे संभाजी कुंभार राजेंद्र देशमाने व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.