
दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। फलटण । येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिंनींनी 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे.
कन्याशाळेत इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल 87.14% लागला. शहरातील सर्वाधिक निकाल आहे. इयत्ता दहावीचा निकाल 96.34% लागला आहे.
बारावी परीक्षेत भाग्यश्री शेखर माने हिने 76.00% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. मेघा शामराव मदने हिने 73.83% गुण मिळवून
द्वितीय क्रमांक मिळवला तर शिवांजली नानासो धायगुडे हिने 72.33 % मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
दहावी परीक्षेत फिजा फिरोज शेख हिने 90.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. प्रगती बाळासो आटोळे हिने 90.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. निषाद रोशनी मेवालाल हिने 89.80% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
फलटण शहरातील व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी आपल्या विद्यालयात प्रवेश घेतात. श्रीराम एज्युकेशन सोसायटी या विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. विद्यालयात दिव्यांग विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले जाते.
यशस्वी विद्यार्थिनींचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सूर्यवंशी (बेडके), ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी बेडके, सौ. ज्योती सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मोदी व सी. एल. पवार, नियामक मंडळाचे सदस्य तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ. व्ही. के. सुरवसे, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.