
दैनिक स्थैर्य । 28 मार्च 2025। फलटण । येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी गोविंद फाउंडेशन फलटण अंतर्गत बायर लर्निंग सेंटरला भेट दिली.
यावेळी बायरचे मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर विनोद मेटकुळे यांनी कंपनीचे उद्दिष्टे, प्रक्षेत्रावर घेण्यात येणारे विविध प्रात्यक्षिके, कंपनीच्या आधुनिक पीक उत्पादन तंत्रज्ञान, पीक उत्पादन पद्धती, पीक संरक्षण, विविध डेमो प्लॉट त्यांना सविस्तर माहिती दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विविध पिकांच्या प्रात्यक्षिक प्लॉटला भेटी देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पिक उत्पादन, पिकांची वाढ, पिक कालावधी, नवीन संशोधित वान उत्पादन, बायर पीक उत्पादन पद्धती या विविध विषयावर प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. यावेळी डॉ. आर. व्ही. कर्चे, प्रा. एस. डी. रोमन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जी. बी. अडसूळ यांनी सहकार्य केले.