
दैनिक स्थैर्य । 4 एप्रिल 2025। फलटण । येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल ही केरळ या ठिकाणी आयोजित केली होती.
यासाठी एकूण 43 विद्यार्थी व 4 प्राध्यापक असे एकूण 47 जण होते. या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी केरळ मधील मुन्नार, थेकड्डी, अलेप्पी, तिरुअनंतपुरम, कोवलम आणि कन्याकुमारी येथे भेट दिली.
यामध्ये मुन्नार मधील चहाचे मळे, थेकड्डी मधील पेरियार टायगर रिझर्व, भारतीय इलायची अनुसंधान संस्था, त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालय, पद्मनाभ मंदिर, विवेकानंद रॉक मेमोरियल अशा अनेक ठिकाणी भेट देण्यात आली.
यादरम्यान उल्लेखनीय बाब म्हणजे तिरुअनंतपुरम येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) या ठिकाणी भेट दिली. यासाठी तिथे कार्यरत असणारे शास्त्रज्ञ वरुण निकम यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. वरूण निकम हे फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांचे नातू आहेत.
या शैक्षणिक सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, संस्थेेचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांचे सहकार्य लाभले. या शैक्षणिक सहलीसाठी प्राध्यापक डी. ए. कुलाळ, प्राध्यापक एस. एम. निकम, प्राध्यापिका आर. डी. नाईकवाडी, प्राध्यापिका एच. एस. तरटे यांची नियुक्ती करण्यात आली होती.