
दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळेमधील विद्यार्थ्यांनी रौप्यपदक व सुवर्णपदक पटकावले.
सोमंथळी येथे शालेय क्रीडा स्पर्धेमधील फलटण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पार पडल्या. या स्पर्धेत फ्री स्टाइल कुस्ती या प्रकारात ६५ किलो वजनी गटात चि. रुद्र किरण सिंग निंबाळकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक प्राप्त केले. तसेच चि. सोहम विजय शिनगारे याने ग्रीको रोमन कुस्ती ४५ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल चि. रुद्र किरण सिंग निंबाळकर व चि. सोहम विजय शिंनगारे यांचे श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. श्री. सचिन भैय्यासाहेब सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र भैय्यासाहेब सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) विद्यालयाच्या प्राचार्य सौ. गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती काकडे मॅडम, क्रीडा शिक्षक बाचल सर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.