फलटणच्या भोईटे्ज गिरिधर सायन्स ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांचे सीईटी परिक्षेत उज्वल यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । फलटण । इयत्ता बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणार्या सीईटी परिक्षा २०२२ चे निकाल नुकतेच जाहीर झाले. त्यामध्ये फलटणच्या भोईटे्ज गिरीधर सायन्स ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. ॲकेडमीमध्ये शिक्षण घेणार्या दोन विद्यार्थ्यांनीना ९९% गुण सीईटी परिक्षेत प्राप्त झाले आहेत. तर इतर सर्व विद्यार्थ्यींनी सुध्दा उज्वल गुणांनी यश संपादन केले आहे.

फलटणमध्ये अकरावी बारावी असो किंवा सीईटी परीक्षा भोईटे्ज गिरिधर क्लासेस ॲकेडमीचा निकाल हा कायमच उज्वलच असतो. यामध्ये प्रामुख्याने ॲकेडमीमध्ये शिवराज सर व मयुर सर हे प्रत्येक विद्यार्थींवर बारकाईने लक्ष देवुन त्यांच्यामध्ये असणार्या अभ्यासू वृत्ती जागृत करतात. जसं म्हणतात ना की, “विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो त्याला घडवुन रंगरूप देण्याचे काम हे शिक्षकांचे असते.” त्याच पद्धतीने शिवराज सर व मयुर सर हे काम करत आहेत. पुणे व मुंबई येथे असणाऱ्या इंट्रीग्रेटेड कोचिंगचा पर्याय सुद्धा भोइटेज गिरीधर क्लास्सेस येथे उपलब्ध आहे.

भोईटे्ज गिरीधर सायन्स ॲकेडमीमध्ये शिकणार्या कांचन हिंगणे हिला ९९.५८ % गुण प्राप्त झाले आहेत त्यामध्ये फिजिक्सला ९७.९३ तर केमेस्ट्रीला ९८.६० गुण प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी गायकवाड हीस ९९.५५ % गुण प्राप्त झाले आहेत त्यामध्ये फिजिक्सला ९९.१३ तर केमिस्ट्रीला ९९.३६ गुण प्राप्त झाले आहेत. या दोघींच्या बरोबरीने तेजस्वीनी काळे हिला ९७.९३ % गुण प्राप्त झाले आहेत त्यामध्ये फिजिक्सला ९३.४४ तर केमिस्ट्रीला ९७.८५ गुण प्राप्त झाले आहेत. यासोबतच इतर सर्व विद्यार्थ्यींनी उज्वल यश संपादन केले आहे.

आगामी काळामध्ये जर आपले पाल्याला पुढील शिक्षणात कोठेही अडचण न येता त्याला स्वतःच्या पायावर ठामपणे उभे करायचे असेल तर त्याला फलटणच्या भोईटे्ज गिरिधर सायन्स ॲकेडमीमध्ये शिवराज सर व मयुर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणेच उचित ठरेल, असे मत पालकांच्यातुन व्यक्त होत आहे.

फलटणमधुन बारामती किंवा पुणे, मुंबई सारख्या शहरात जावुन लाखो रूपये फी भरून आपल्या पाल्याला बाहेरगावी ठेवण्याऐवजी फलटणमध्ये घरी राहुनच पुणे, मुंबई मधील ॲकेडमी सारखे शिक्षण ते ही गुणावत्तेच्या हमीवर व थोड्याच फीमध्ये शिक्षण देण्यासाठी भोईटे्ज गिरिधर सायन्स ॲकेडमीमध्ये आपले ॲडमिशन फायनल करा.

भोईटे्ज गिरिधर सायन्स ॲकेडमी ही फलटण – गिरवी रोडवर श्रीमंत संजीवराजे नगर येथे आहे. तरी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच संपर्क ( 9970161782 / 8806869571 ) साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!