विद्यार्थांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२१ | फलटण | फलटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेली मंडळी प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट असे काम करून फलटण तालुक्याचा नावलौकिक उंचावत आहेत, हि बाब कौतुकास्पद असून सध्या तालुक्यातील जी मुले MPSC चा अभ्यास करत आहेत, अश्या विद्यार्थ्यांना जर अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले तर त्या विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होईल. फलटण तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या मुलांचे दिल्लीमध्ये प्राबल्य असणे गरजेचे आहे, असे मत विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण तालुक्यातील प्रशासनात कार्यरत असणार्या अधिकार्यांना ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते “फलटण गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळेस सौ. निलम विजय लोंढे – पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, भोजराज नाईक निंबाळकर, अर्जुनराव घाडगे, मंगल घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळेस मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त राजेंद्र व्हटकर, पुण्याचे अप्पर आयुक्त आनंद रायते, महसूल व वन विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, उत्पादन शुल्क विभागाचे उपयुक्त सुनील चव्हाण, पर्यटन विभागाचे सहसंचालक धनंजय सावळकर, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमंत निकम, पुण्याचे उपजिल्हाधिकारी संजय तेली, सातारचे उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, ठाणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता राम शिंदे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजयराव मुळीक, तहसीलदार सचिन लंगुटे यांना यावेळी “फलटण गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मल्हारराव होळकर यांचा इतिहासात महत्वपुर्ण आहे. अशा असामान्य व्यक्तिमत्वाचा पुतळा उभारु शकलो नाही ही खंत आहे. फलटण तालुक्यातील मुरुम हे त्यांचे जन्मगाव असल्याचे अनेकांना माहिती नाही ही सुद्धा दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे त्यांचा पुतळा व्हावा ही आपली ठाम इच्छा आहे, कारण छत्रपती सईबाई राणीसाहेब आपल्या सर्वांना जशा प्रिय वाटतात, तसेच होळकरांच्या इतिहासाची जपणूक व्हायलाच हवी, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर स्पष्ट केले.

कार्यक्रमात लायन्स क्लबचे संस्थापक मेल्वीन जोन्स यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. मान्यवरांचे स्वागत सौ. निलम लोंढे पाटील यांनी केले. तर प्रास्तविक नगरसेविका सौ. वैशाली चोरमले यांनी केले व सूत्रसंचालन सौ. राजश्री शिंदे यांनी केले. तर आभार प्रितम लोंढे पाटील यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!