दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२४ | फलटण |
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याबरोबरच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास करून व्यक्तिमत्व विकास करणे गरजेचे असल्याचे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
म्हसवड येथील फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड यांच्या वतीने वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय दिक्षित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्रीमंत अॅड. पृथ्वीराज राजेमाने, ट्रेझरर श्री. हेमंत रानडे, डॉ. सी. डी. पाटील सर, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर, प्रताप पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील बी. कॉम. भाग दोनची विद्यार्थिनी कु. आरती अकाराम पडळकर हिने शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स टीचर्स असोसिएशन आयोजित विद्यापीठस्तरीय ‘बेसिक स्टॅटिस्टिक्स क्विज स्पर्धा २०२४’ मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. म्हसवडसारख्या दुर्गम भागातून येऊन कु. आरती हिने विद्यापीठस्तरावर मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कु. आरती हिला प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी महाविद्यालय परिसरात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अॅड. राजू भोसले, प्रा. प्रकाश निंबाळकर, प्रा. पवार आर. जी., प्रा. कु. प्रज्ञा माने, प्रा. प्रवीण मोरे, प्रा. कु. ए. आर. माने, राजेंद्र अडगळे, प्रा. मिलिंद शिंगाडे, प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी, प्रा. महेंद्र चव्हाण, प्रा. प्रभाकर बनसोडे, प्रा. चंद्रकांत टकले, प्रा. शिवाजी शिखरे, प्रा. डॉ. गजानन बनगर, प्रा. अभिषेक रणवरे, प्रा. क्षीरसागर, प्रा. डॉ. संतोष लाळगे या प्रमुख मान्यवरांसहीत प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.