ऑनलाइन अध्ययन व्यासपीठांच्या माध्यमातून स्वयं-अध्ययन उपयुक्त असल्याचे विद्यार्थ्यांचे मत – ब्रेनली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । मुंबई । जवळपास दोन शैक्षणिक वर्षे घरातूनच शिक्षण घेत उलटली आहेत. दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाइन अध्ययन व्यासपीठांच्या वापरामध्ये लक्षणीय गुणवत्ता दिसून आली आहे. अनेक महिने घरांमधूनच शिक्षण घेतल्यानंतर विद्यमान शैक्षणिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ब्रेनली या ऑनलाईन अध्ययन व्यासपीठाद्वारे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. ७१ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्ययन व्यासपीठांच्या माध्यमातून स्वयं-अध्ययन करणे उपयुक्त वाटत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. यामधून विद्यार्थ्यांमध्ये स्वयं-अध्ययनाला चालना देण्यामध्ये ऑनलाइन अध्ययन व्यासपीठांची भूमिका दिसून येते.

ब्रेनली हे प्रश्नोत्तरांपासून आकलनापर्यंत ३५० दशलक्षहून अधिक विद्यार्थी-पालकांच्या पसंतीचे ऑनलाईन अध्ययन व्यासपीठ असून एकूण १,७५१ प्रतिसाद प्राप्त केलेले हे सर्वेक्षण २०२१ मधील अनेक रोचक ट्रेण्ड्स आणि २०२२ साठी असलेल्या अंदाजांबाबत माहिती देते. या सर्वेक्षणातून निदर्शनास आले की, लॉकडाऊन कालावधीदरम्यान अर्ध्याहून अधिक (५६ टक्के) विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेसचा आधार घेतला. म्हणूनच वैयक्तिकृत, वन-ऑन-वन अध्ययन ही प्रभावी अध्ययन पद्धत मानली जाते.

२०२२ मध्ये अध्यापनाची हायब्रिड पद्धत सुरू राहण्याची इच्छा:

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यासपीठांशी जुळवून घेण्यासोबत या माध्यमाद्वारे उत्तमपणे शिकण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्वेक्षणातील निष्पत्तींमधून दिसून येते. ७८ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांनी २०२१ मध्ये उत्तम शैक्षणिक कामगिरी केली. मागील सर्वेक्षणामध्ये व्यासपीठाने निदर्शनास आणले की, ७७ टक्के विद्यार्थी शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर देखील ऑनलाइन अध्ययन व्यासपीठांकडून मार्गदर्शन घेत राहतील. यामधून ऑनलाइन अध्ययन व्यासपीठांची प्रबळ क्षमता दिसून येते, जेथे ७१ टक्के विद्यार्थ्यांना २०२२ मध्ये हायब्रिड पद्धतीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवायला आवडेल.

२०२२ मध्ये अधिकाधिक शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होण्याची अपेक्षा:

भारतीय विद्यार्थ्यांनी कोविड-१९ प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीशी जुळवून घेतले असले तरी बहुतांश विद्यार्थी त्यांच्या सहका-यांना, तसेच शिक्षकांना भेटण्याची वाट पाहत होते. २०२१ च्या उत्तरार्धात अंशत: शाळा सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थी कमी प्रमाणात शाळेत गेले. ६४ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की शाळा पुन्हा सुरू झाल्याने त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम झाला, तर ६८ टक्के विद्यार्थ्यांना २०२० व २०२१ दरम्यान त्यांच्या शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीमध्ये मोठा बदल झालेला दिसण्यात आला. मागील ब्रेनली सर्वेक्षणातून निदर्शनास आले की, ८२ टक्के विद्यार्थी प्रत्‍यक्ष शाळांमध्ये परतण्यास उत्‍सुक होते. भारत १५ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे वर्ष २०२२ मध्ये अधिकाधिक शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

ब्रेनलीचे प्रमुख उत्पादन अधिकारी राजेश ब्यासनी म्हणाले, “विद्यार्थी प्रत्यक्ष शाळांमध्ये त्यांचे सहकारी व शिक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच ते ऑनलाइन अध्ययन पद्धतींसोबत सकारात्मकतेने जुडले गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीमधून प्रेरणादायी ट्रेण्ड्स दिसून येत असताना सर्वेक्षणातील निष्पत्ती ब्रेनलीच्या विश्वासाला अधिक सार्थ ठरवतात आणि तो विश्वास म्हणजे हायब्रिड अध्ययन सर्वोत्तम तंत्रज्ञान-केंद्रित साधने व वैयक्तिकृत अवधानासह २०२२ मध्ये व त्यापुढील काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात प्रभुत्व राखेल.”


Back to top button
Don`t copy text!