दैनिक स्थैर्य । दि.२३ जानेवारी २०२३ । बारामती । पालकांनो ,मुलांना ‘माणूस ‘ बनवा, वेळ द्या, ,त्यांच्या समोरील आव्हाने समजून घ्या,एकवेळ पैसा,संपत्ती कमी कमवा परंतु योग्य वयात भरपूर संस्कार द्या तरच आपला पाल्य कठीण परिस्थितीत यश सहज मिळवेल व मिळालेले यश टिकवेल व दिखाऊ नको तर टिकाऊ बना असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व समूहपदेशक प्रा. सुमित उरकुडकर यांनी केले.
लडकत सायन्स अकॅडमी च्या वतीने विद्यार्थ्यां साठी गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मान,स्कॉलरशिप परीक्षा व पालक व विद्यार्थी यांच्या साठी ‘सुजाण पालकत्त्व व मुलांचा अभ्यास’ या विषयावर प्रा. सुमित उरकुडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते या प्रसंगी प्रा. उरकुडकर बोलत होते.
या वेळी माजी प्राचार्य यु. एम.शिंदे, जलसंपदा विभागाचे अभियंता चंद्रशेखर लडकत,म्हसवड पंचायत समिती चे विस्तार अधिकारी बाळासाहेब जाधव,दत्तात्रय लडकत व लडकत सायन्स अकॅडमी चे संस्थापक प्रो नामदेव लडकत , संचालक प्रो. गणेश लडकत व प्रा.सौ. अना चौधरी ,आदी मान्यवर उपस्तीत होते.
पालक व पाल्य संवाद झाला पाहिजे, मोबाईल, टीव्ही चा फक्त कामपूरता वापर झाला पाहिजे, जीवनात संघर्ष आहे हे स्वीकारा व यश मिळवल्यार ते टिकवण्यासाठी प्रयत्न करा,दिखाऊ न राहता टिकाऊ राहण्याचा प्रयत्न करा, आई वडिलांचे स्वप्ने पूर्ण करा त्याचा आदर करा, स्वतःवर विश्वास ठेवा मी जिकणारच या भावनेने प्रत्येक परीक्षा देत रहा नक्की यश येणार असा सल्ला देत व विविध क्षेत्रातील उदाहरणे देत प्रा. सुमित उरकुडकर यांनी उपस्तीताची मने जिंकली.
वैदकीय, अभियंता,संरक्षण क्षेत्र आदी क्षेत्रातील परीक्षा साठी गुणवत्ता व दर्जा देत अनुभवी व तज्ञ प्राध्यापक , व अत्याधुनिक तंत्रज्ञान चा वापर करत विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण लडकत सायन्स अकॅडमी देत असल्याने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा अकॅडमी मध्ये टक्का वाढत असल्याचे प्रा नामदेव लडकत यांनी सांगितले.
सीईटी ,नीट, जेईई ,एनडीए त्याच प्रमाणे इंटिग्रेटेड व फौंडेशन कोर्सेस व स्कॉलरशिप परीक्षा अकॅडमी च्या वतीने देत असलेल्या सेवा सुविधा आदी बदल माहिती प्रा. सौ.अना चौधरी यांनी दिली.
अकॅडमी ने दिलेले अचूक व योग्य मार्गदर्शन मुळे नीट परीक्षेत ६१५ मार्क्स मिळवून शासकीय वैदकीय महाविद्यालय नागपूर येथे प्रवेश मिळू शकल्याचे गंगासागर सावंत हिने मनोगत मध्ये सांगितले.
गेल्या वर्षी नीट, जेईई, स्कॉलरशिप परीक्षा व कार्यक्रम स्थळी घेतलेल्या स्कॉलरशिप परीक्षा मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. माने यांनी केले.