दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । आटपाडी । श्रीराम बहुउद्देशिय सेवाभावी संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय आटपाडी व श्रीराम ज्युनिअर कॉलेज आटपाडी मध्ये इ. ११वी कला व विज्ञान शाखा व बी. भाग १ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम मंगळवार दि. ३०/०८/२०२२ रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आटपाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पी आय, मा. श्री. शरद मेमाणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. विजयकुमार पाटील होते. कार्यकमाचे प्रमुख म्हणून मार्गदर्शन करताना मा. श्री. शरद मेमाणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विचार बदलने गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही मनाने खंबीर असले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरावेत परंतू सायबर क्राईम बद्दलची माहिती करून घेतली पाहिजे, भविष्यकाळ हा मेंटल डिप्रेशनचा असणार आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कायद्याची पाहिती घेवून कायदे पाळणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्यावरती कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद होवू नये असे वागावे. अध्यक्ष पदावरून मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले आज इ.११वी व बी.ए. भाग १ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने व महाविद्यालयाच्या वतीन स्वागत करून श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या सर्व महाविद्यालयांचा आढावा सांगितला तसेच कॉलेजचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत काही विद्यार्थी शासकीय अधिकारी, चित्रपट, राजकारण क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचा आजी विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा तसेच जीवनामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर सर्व काही शक्य होईल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बी.जे. वाघमोडे, सुत्र संचालन डॉ. आर. एस. नाईकनवरे मनोगत प्रा. टिंगरे एस. आर प्रा. ए. एम. हातेकर श्री. सागर जरे श्री. पुकळे यांनी केले तर आभार डॉ. बी. एस. कदम यांनी मांडले. यावेळी प्रा. बी.एम. देशमुखे मॅडम प्रा. सचिन सरक, प्रा. नागेश चंदनशिवे, प्रा. हुलगे, प्रा. अश्विनी भगत प्रा. प्रतिभा करांडे प्रा. सारीका घाडगे, श्री. गोविंद चव्हाण, श्री. गणेश केदार तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.