लडकत अकॅडमीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद


दैनिक स्थैर्य | दि. २६ डिसेंबर २०२३ | बारामती |
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व अभ्यासाची एकाग्रता वाढवून गुणांमध्ये रूपांतर होणेसाठी लडकत सायन्स अकॅडमी बारामतीने इयत्ता १० वीत शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी (विज्ञान) नीट, जेईई, सीईटी प्रवेशासाठी लडकत शिष्यवृत्ती २०२४ परीक्षेचे आयोजन २४ डिसेंबर रोजी आयोजन केले होते. या परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून नोंदणीकृत व सरळ प्रवेशामार्फत राज्यभरातून एक हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

सी.बी.एस.सी. तसेच स्टेट बोर्ड विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेद्वारे विद्यार्थांना ११ वी/ नीट, जेईई व सीईटी इ. स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठीच्या प्रवेशा करिता रूपये दोन लाखपर्यंत स्कॉलरशीप दिली जाणार आहे. येत्या डिसेंबर २८ तारखेला या परीक्षेचा निकाल घोषित केला जाणार आहे. तसेच या परीक्षेचा दुसरा टप्पा दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला जाईल. फक्त परीक्षेसाठी अभ्यास न करता या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने शिकवलेला विषय योग्य आकलन करून समजून घेऊन अभ्यास केला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सियुरिटी इ. फील्डमध्ये नवनवीन संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी सुद्धा लडकत अकॅडमी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत आहे.

दर्जात्मक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शिक्षण देताना शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा व १४ जानेवारी २०२४ रोजी होणार्‍या लडकत स्कॉलरशिप परीक्षेच्या दुसर्‍या भागामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन लडकत सायन्स अकॅडमीचे संचालक नामदेव लडकत यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!