
दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२५ | फलटण |
सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत जिल्हा सातारा यांच्या वतीने फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पांतर्गत विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे केले होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार स्वर्गीय लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या पत्नी व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मातोश्री श्रीमती मंदाकिनी हिंदूराव नाईक निंबाळकर उपस्थिती होत्या.
या शिबिरात फलटण तालुक्यातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमास शरद भरमगुंडे, प्रवीण देशपांडे, राहुल बर्गे, सुषमा कोटे, विक्रम सुर्वे, प्रा. सौ. माधुरीताई दाणी आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात संयोजक हेमंत देशपांडे, योगेश ढेकळे, स्वानंद जोशी, राहुल वर्ग यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन श्रीमती मंदाकिनी हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी सत्कार केला.
शिबिरातून यशस्वी भावी पिढी निर्माण व्हावी व हे सत्कार्य या संस्थेच्या हातून निरंतर घडत राहो, अशा शुभेच्छा श्रीमती मंदाकिनी हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिल्या.